प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातील कुरुकली येथील सुनिता कृष्णात पाटील (वय 45) या महिलेने त्या परिसरातील महिलांना दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून त्या महिलांच्या नावाने वेगवेगळ्या बँकेत कर्ज घेऊन फसवणूक केली आहे.आज फसवणूक झालेल्या महिलांनी शनिवारी (ता.9) रोजी करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन सुनिता कृष्णात पाटील यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे.
अधिक माहिती अशी की,कुरुकली गावातील सुनिता पाटील या महिलेने कोरोना काळात गावातील महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन करून प्रत्येक महिलेला दोन हजार रुपये देणार असल्याचे सांगून त्यांच्या नावाचे आधार कार्ड ,बँकेचे पासबुक ,रेशन कार्डांच्या झेरॉक्स प्रतीसह फोटो घेऊन या कागदपत्राच्या आधारे जिल्हा बँकेसह इतर खाजगी बँकासह फायनान्स कंपन्या कडुन प्रत्येक महिलेच्या नावावर 30 ते 50 हजार रुपयांची कर्जाची उचल केली आहे.सुरुवातीचे काही महिने वेळेवर हप्ते भरले . नंतर मात्र हप्ते थकल्याचे वसुली अधिकारी यांच्या निदर्शनास आले.दरम्यान कागदपत्रे देणारयां महिलांची संख्या वाढली.मात्र कर्जाचे हप्ते थकल्यामुळे गेल्या वर्षभरापासून वसुली पथके महिलांच्या दारात येऊ लागल्याने महिलांची भंबेरी उडाली.सदर महिलांनी सुनिता कृष्णात पाटील हिच्याकडे चौकशी करुन कर्जाचे हप्ते भरण्याची विनंती केली असता तीने नकार दिला.यावर या महिलांनी एकत्र येऊन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन सुनिता कृष्णात पाटील हिच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला.जवळ जवळ एक कोटीच्या वर फसवणूकीची रक्क्म असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील काही महिलांनी आमच्या कर्ज अर्जावर सह्या कोणी केल्या याची चौकशीची मागणी केली जात आहे.
या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण ?.
महिलांची फसवणूक केलेल्या सुनिता कृष्णात पाटील यांचे शिक्षण फक्त सातवी प्रर्यत झाल्याचे समजते.हे काम इतकं सोपं आणि एकट्या दुकट्याचे काम नाही .या महिलांचे कागदपत्रे गोळा करून बँकातुन कर्ज मंजूर करून घेई प्रर्यत तिला कोणीतरी मदत केल्याची शक्यता असण्याची पोलिसांना संशय आहे.या मुळे या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण ? याची गावात चर्चा रंगली आहे.