6 मार्च, 7 मार्च व 8 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा दैनिक वृत्तपत्रांना साप्ताहिक वृत्तपत्रांना का? देण्यात आले नाही.
प्रेस मीडिया लाईव्ह :
औरंगाबाद- साप्ताहिक वृत्तपत्रावर झालेल्या अन्याय बाबत व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकार औरंगाबाद यांना व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे निवेदने सादर करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासन हे सतत साप्ताहिक वृत्तपत्रावर अन्याय करीत असून मोठे पेपरांना जाहिरात देतात परंतु साप्ताहिक वृत्तपत्रांना शासनाच्या जाहिरात का देण्यात येत नाही अशी खंत अब्दुल कय्युम यांनी व्यक्त केलेली आहे.यापुढे शासनाने साप्ताहिक वृत्तपत्रावर अन्याय करू नये समान जाहिरात वाटप करावे असे यावेळी बोलताना सांगितलेले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या स्वरूपाच्या दर्शनी जाहिरात जिल्हा दैनिकप्रमाणे साप्ताहिक वृत्तपत्रांना दिनांक 6 मार्च, 7 मार्च व 8 मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा दैनिक वृत्तपत्रांना विकसित भारत व विकसित महाराष्ट्रच्या दर्शनी जाहिरात वितरित करण्यात आलेल्या आहेत, परंतु या जाहिराती वाटपात महाराष्ट्रातील साप्ताहिकांना डावलण्यात आले. विकासात्मक धोरणाच्या जाहिराती देताना सर्व वृत्तपत्रांना समान जाहिराती वाटप व्हायला पाहिजे, असे धोरण महाराष्ट्र शासनाने राबवावे, जेणेकरून लघु वृत्तपत्रांवर अन्याय होणार नाही. या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विकासाला वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत शासनाच्या योजना व्यापक प्रमाणात पोहोचवता येतील. तरी महोदय आपणास विनंती आहे की , महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना या योजनांची जाहिरात देऊन उपकृत करावे ,अशी विनंती आहे.
साप्ताहिक हा शेवटच्या घटकापर्यंत जाऊन पोहोचणारा दुवा म्हणून काम करतो. आपल्या शासकीय योजना, चांगुलपणाचे अनेक विषय साप्ताहिकच लोकांपर्यंत पोहोचवतात. त्याच साप्ताहिकांना डावलण्याचे काम सतत होत आहे. उत्तम बातम्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम साप्ताहिक आहे. त्याच पद्धतीने आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा निरोप साप्ताहिकवालेच उतम पद्धतीने करतात.
कृपया मागे झालेल्या अभियानात या जाहिराती देण्यात याव्यात. आणि पुढच्या सर्व अभियान, उपक्रमाच्या जाहिरातीमध्ये आम्हाला डावलण्यात येऊ नये. हा एकच विषय नाही यापूर्वीच्या अनेक विषयांमध्ये साप्ताहिकाला डावलण्याचं काम होते. साप्ताहिकांना आपण न्याय देण्याची भूमिका घ्या. आपणास विनंती आहे की, आपण जाहिराती का दिल्या नाहीत? आणि यापुढे आपण जाहिराती देणार तर कशा देणार? याबाबत स्पष्टीकरण देणारे पत्र आपण काढावे. आपण तसे पत्र जर काढले नाही तर आम्हाला नाईलाजास्तव राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, माहिती कार्यालय आणि मंत्रालयाच्या समोर उपोषणाला बसावे लागेल.
आपण आम्हाला न्याय द्याल, ही अपेक्षा आहे. मराठवाडा अध्यक्ष अब्दुल कय्युम अब्दुल रशीद, अंबादास तळणकर, बबन सोनवणे, संजय हिंगोलीकर, गणेश पवार,सय्यद शब्बीर, सय्यद करीम, अब्दुल गणी, मिर्झा शफिक बेग,डॉ शेख शकील जिल्हाअध्यक्ष साप्ताहिक विंग, शेख ईलयास,दिशा सुरवसे पाटील, इस्माईल हुसैन आदीं उपस्थित होते.