प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 मधील चोकाक ते अंकली या भागातील भूसंपादन होणाऱ्या दुपटीने अन्याय भूसंपादन प्रकरणी कोर्टामध्ये दाद मागण्याचा निर्धार आज अतिग्रे येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला यावेळी अनेक लोकांनी आपली मनोगते व्यक्त केली जयसिंग मुसळे, आनंदा पाटील, भोपाल कुंभार, संजय सूर्यवंशी ,बाजीराव लोहार ,यांनी आपले मनोगत व्यक्त केली याप्रसंगी हनुमंत पाटील उपस्थित होते
चोकाक ते अंकली या भागाचे भूसंपादन होताना विविध अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सन 2021 चा दुप्पट नुकसान भरपाई मिळणारा शासन निर्णय लागू होईल असे सांगण्यात आले परंतु सदरचा भाग हा प्रगतीपथावरील असणाऱ्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग असल्याने सदर भूसंपादनास पूर्वीचा चार पटीचा शासन निर्णय लागू करावा अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली
अनेक लोकप्रतिनिधींना निवेदने देऊनही सदर कामे कोणताही निर्णय झालेला नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सदर भूसंपादनाचे मार्किंग चे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे सदरचे काम त्वरित थांबावे व चार पटीने मोबदला मिळण्याचा निर्णय जाहीर करावा अशी ही मागणी या निमित्ताने करण्यात आली सदर बैठकीस भरत शिंदे ,मानसिंग मुसळे ,शिंदे मॅडम, प्रशांत पाटील ,महेश कावणे ,प्रतीक मुसळे ,आत्माराम बिडकर ,शीलवंत बिडकर ,संतोष कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते
यावेळी मार्गदर्शन करताना एडवोकेट चिंतामणी कांबळे म्हणाले की एकाच रस्त्याच्या भूसंपादनामध्ये मोबदल्यात असणारे वेगवेगळे निकष हे समतेच्या तत्वाला बाधा आणणारे आहेत सदर भूसंपादन अधिकारी हे अध्याप स्पष्टपणे भूसंपादन किती पटीने असेल हे लेखी स्वरूपात जाहीर करत नाहीत त्यापूर्वीच भूसंपादनासाठी हद्द निश्चित करण्याची प्रक्रिया ही नागरिकांवर अन्याय करणारी आहे अनेक लोकप्रतिनिधींना निवेदने देऊनही कोणीही ठोस आश्वासन दिलेले नाही येत्या निवडणुकीत लोकांमध्ये याबाबतीत मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती केली जाईल महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर सदर निर्णय घेऊन लोकांना दिलासा द्यावा अन्यथा भूसंपादनातील बाधित लोकांच्या वतीने न्यायालयात दाद मागावी लागेल