प्रेस मीडिया लाईव्ह ;
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथे गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे अतिग्रे गावची दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता अतिग्रे गावचे लोकनियुक्त सरपंच यांनी गावचे असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे माननीय श्री विजय गणपतराव कुंभार यांच्याशी संपर्क साधून गावासाठी पिण्याचा पाण्यासाठी अतिग्रे येथे असणाऱ्या राजश्री शाहू तलाव मध्ये विहीर खोदणे या कमी चर्चा करण्यात आली .
या कामी कुंभार साहेब यांनी तलाव मध्ये विहीर खुदाई साठी कूपर इंडस्ट्रीज सातारा चे अध्यक्ष माननीय श्री फारुख जी कुपर साहेब यांच्याशी चर्चा केली व त्यांनी अतिग्रे गावासाठी दहा लाख रुपये निधी दिला आहे या कामी विशेष सहकार्य कूपर इंडस्ट्रीजचे मॅनेजर माननीय श्री नितीनजी देशपांडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे माननीय श्री विजय गणपतराव कुंभार यांचे लाभले माननीय सरपंच साहेब यांनी केलेला पाठपुरावा हे अतिग्रे गावासाठी मोठी योगदान आहे कूपर इंडस्ट्रीने दिलेल्या दहा लाखाचा निधी राजश्री शाहू तलाव मध्ये पन्नास बाय पन्नास ची नवीन विहीर खोदणे शुभारंभ मोठ्या उत्साहात व थाटामाटात झाला
या विहिरीचे पूजन माननीय श्रीमती सुनंदा गणपतराव कुंभार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले
यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच माननीय श्री सुशांत वड्ड ,उपसरपंच बाबासाहेब पाटील ,सदस्य भगवान पाटील ,अनिरुद्ध कांबळे, राजेंद्र कांबळे, नितीन पाटील ,सदस्या कलावती गुरव, अक्काताई शिंदे ,कल्पना पाटील, दिपाली पाटील ,छाया पाटील, ग्राम विकास अधिकारी बाबासाहेब कापसे ,माजी सरपंच पांडुरंग पाटील ,माजी सरपंच श्रीधर पाटील ,धनाजी पाटील ,अमर पाटील ,उत्तम पाटील, भरत शिंदे, तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील ,बाबासाहेब शिंदे, धुळोबा पाटील ,ग्रामविकास अधिकारी अशोक मुसळे ,प्रदीप पाटील ,संजय चौगुले ,संदीप सूर्यवंशी ,आडवोकेट चिंतामणी कांबळे ,किशोर बोरगावे, विश्वास पाटील ,विनायक पाटील, सुजित पाटील ,कृष्णात पाटील ,प्रकाश सूर्यवंशी ,माननीय डॉक्टर पाटील साहेब, व अतिग्रे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते