वाठार येथे झालेल्या भीषण अपघातात ठेकेदारासह तिघे ठार तर सात जखमी.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- किणी -वाठार येथे भीषण अपघात होऊन सेंट्रिंग ठेकेदार बाबालाल इमाम मुजावर (वय 50) विकास धोंडीराम वड्ड (32)श्रीकेश्वर पास्वान (60)आणि सचिन धनवडे  (सर्व रा.भादोले). यांचा मृतात समावेश आहे.तर सुनिल कांबळे,सचिन नलवडे ,लक्ष्मण मनोहर राठोड (40) ऐश्वर्या लक्ष्मण राठोड(17)सविता लक्ष्मण राठोड  ,कुमार अवघडे अन्य एकाचे नाव समजले नाही (सर्व रा.भादोले ). याच्यासह 7 जण जखमी झाले आहेत.




अधिक माहिती अशी ठेकेदार बाबालाल मुजावर हे आपल्या कामगारा समवेत स्लॅब टाकून  किणी वाठार  येथे मिक्सर मशीन जवळ थांबले होते. त्यांना 10 चाकी ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर जखमीना 108 AMBULANCE गाडीतुन पाच जणांना आणताना वाटेतच एकाचा मृत्यु झाला तर 4 जण जखमी झाले आहेत तर जगद्गुरु नरेंद्र महाराज या गाडीतुन 6 जणांना आणताना दोघांचा वाटेतच मृत्यु झाला असून बाकीचे जखमी झाले असून त्यात  दोन महिलांचा समावेश आहे.हे सर्व जण भादोले येथे रहात असून  या अपघाताची माहिती गावात कळताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवारांनी एकच गर्दी केली होती.मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.या ठिकाणचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. 

जखमीना गजेंद्र कोळेकर (रा.बांबवडे ) यांच्यासह नागरिकांनी सर्वाना बाहेर काढ़ून 108 चा चालक अनंत आवळकर (इंचलकरंजी )यांच्या गाडीतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकित रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.

Post a Comment

Previous Post Next Post