पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आला.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

फिरोज मुल्ला सर 

पुणे :  निर्भय बनो  या कार्यक्रमासाठी  आलेले पत्रकार निखिल वागळे  यांच्या गाडीवर पोलिस बंदोबस्त असतानाही प्राणघातक हल्ला करण्यात आला. तर शाईफेक तसेच अंडी फेक करण्यात आली.भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर निखिल वागळे यांना निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला.

यावेळी निर्भय बनो कार्यक्रमाासाठी आलेल्या नागरिकांनी वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. यामध्ये काही तरुणी सुद्धा जखमी झाल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात वागळे यांच्या अंगावरही शाई पडली. पोलिस बंदोबंदास्त प्रवास होत असतानाही गाडी चारी बाजूने फोडण्यात आली आहे. भाजपकडून विरोध केल्यानंतर महाविकास आघाडीकडून वागळे यांचा कार्यक्रम होणारच, असा पवित्रा घेतला. वीटा सुद्धा फेकून मारण्यात आला, असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला. कपडे फाडण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप काही महिलांनी केला.

निर्भय बनो कार्यक्रमाचे आयोजन  पुण्यातील साने गुरुजी हॉल मध्ये  करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या आधी या कार्यक्रमात भाषण करणाऱ्या पत्रकार निखील वागळे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास सुरक्षा पुरवू अशी भूमिका काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी घेत कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. 

या मध्ये  काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप , आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, संजय मोरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आले.याघटनेवर आता पुढे पोलिस काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post