आर्थिक धोरणामुळे हुकूमशाह भाजपाचा पराभव होणार-डॉ. विश्वंभर चौधरी
हुकूमशाही संपवण्यासाठी जनतेने लोकशाहीचा दणका दिलाच पाहिजे-फिरोज मुल्ला सर
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे प्रतिनिधी :
पुणे.."लोकसंसद"हा कार्यक्रम जेष्ठ विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला ते जनतेला संबोधित करताना म्हणाले हुकूमशाही येणार आहे म्हणून २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या केंद्र सरकारची हुकूमशाही नष्ट करण्यासाठी वाड्या वस्त्यांमध्ये जावून जनजागृती करून देश संकटात आला आहे त्याकरिता लोकांना लोकशाहीचे राज्य आणण्यासाठी आवाहन करू असे डॉ कुमार सप्तर्षी यांनी सांगितले
डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले भाजप स्वतःची ताकद फुगवून सांगत आहे पण उलट परीस्थिती आहे इंडिया आघाडीची ताकद आजूनही चांगली आहे भाजप मिडियाच्या माध्यमातून खोट्या आश्वासनाची जाहिरात दाखवून जनतेची दिशाभूल करत आहे महाराष्ट्रात भाजप खासदारकीचा दहाचा आकडा पार करणार नाही ही वस्तुस्थिती आहे केद्रसरकार बद्दल शेतकरी आणि जनतेमध्ये प्रचंड चिड आहे हे घर फोडणार भिती दाखवणार सरकार आहे असे मनोगत व्यक्त केले
पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) म्हणाले की हुकूमशाही संपवण्यासाठी घरा घरात जा गो जागी गल्ली बोळात आत्मविश्वासाने चर्चा करून जागृती करून हे हुकूमशाही सरकार आपण सर्वजन मिळून पाडू शकतो लोकशाही मध्येच हुकूमशाही पद्धतीने कारोबार करणाऱ्या सरकारला पाडण्याची संधी मिळते आणि ते पडूही शकते, लोकशाहीचे राज्य आणून आपली नैतिक जवाबदारी आहे आणि संविधानवादी लोकशाहीवादी जनतेने हुकूमशाहीवाले सरकार २०२४ मध्ये पाडलेच पाहिजे असे फिरोज मुल्ला यांनी ठासून सांगितले
यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे हे स्वागत अध्यक्ष स्थानी होते त्यांनी आलेल्या सर्व वक्ते जनतेचे स्वागत केले तसेच कायदेतज्ज्ञ अँड.आसीम सरोदे, युनुस तांबटकर,चंद्रकांत झटाले,धर्मकीर्ती महाराज परभणीकर,डॉ. अभिजित वैद्य, बिशप थाँमस डाबरे,आदी वक्ते यांनी आपली हुकूमशाह सरकारच्या विरोधात मनोगत व्यक्त केली सुत्रसंचालन संदिप बर्वे यांनी केले जांबुवंत मनोहर यांनी आभार मानले