प्रेस मीडिया लाईव्ह :
नांदेड : "अशोक चव्हाण भाजप मध्ये जाण्याने मला कसले ही आश्चर्य मला वाटत नाही कारण काँग्रेस मध्ये असताना अशोक चव्हाण यांनी कधीही मुस्लिम समाजास सामाजिक, शैक्षणिक, राजकिय, व समाजाला पुढे आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत
प्रस्तापित, घराणेशाही, कारखानदार नेत्यांना विचारधारा नसते त्यांना त्यांची संपत्ती सांभाळणे आणि गोळा करणे हाच एकमेव उद्देश असतो. आज पर्यंत नांदेड शहरावर चव्हाण कुंटूबाचे वर्चस्व आहे अ सताना देखील शहरातील मुस्लीम बांधवांचा जेवढा विकास व्हावा तेवढा केला नाही. आता त्यांनी कांग्रेस सोडले आहे असे जाहीर केलेले आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी आता विचार करा व आपल्या पुढील पिढीसाठी शैक्षणिक , राजकिय व आपल्या समजास प्रगती पथावर न्यायचे असेल तर माझे मुस्लिम बांधवानी एकजुटीने शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन शिवसेनेत सामील होऊन पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत मतदान केल्यास लोकसभा, विधानसभा व महानगरपालीके वर शिवसेनेचा ध्वज फडकल्या शिवाय रहाणार नाही