प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - सिध्दार्थ नगर येथील राजेश बुध्दम कांबळे (वय 37) याने छताच्या लोखंडी पाइपला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाइकांच्या लक्षात येताच त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण त्याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
या घटनेची नोंद सीपीआर पोलिसांत झाली आहे.त्याचा मृत्यु झाल्याचे नातेवाइकांना समजताच त्याच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्यांच्यावर गुन्हा दाखल केल्या शिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची जमावाने भूमिका घेतली होती.
तेव्हा सीपीआरच्या पोलिस अंमलदारानी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून यातुन मार्ग काढ़त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.त्याच्या हजरजबाबीपणाने पुढ़ील वाद टळला राजेश हा कोल्हापूर महानगरपालिकेचा कर्मचारी असून त्याच्या पश्यात आई व दोन बहीणी आहेत.तो विवाहीत असून त्याला 15 वर्षाची मुलगी आहे. त्याने पत्नीच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केल्याची नागरिकांत दबक्या आवाजात चर्चा आहे. या घटनेने त्या परिसरात हळ व्यक्त होत आहे.