प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : थोरात उद्यान हे कोथरूड परिसरातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वापराचे उद्यान आहे. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर कोथरूड येथील थोरात उद्यानामध्ये चालण्यासाठी, पळण्यासाठी, व्यायामासाठी, योग अभ्यास करण्यासाठी, विश्रांतीसाठी येतात. लहान मुले खेळण्यासाठी या उद्यानाचा वापर करतात. कोथरूड परिसरात मोकळ्या जागांचा तुलनेने अभाव असल्याने या उद्यानात सकाळी व संध्याकाळी गर्दी होते.
थोरात उद्यानातील मोकळी जागा दिवसेंदिवस कमी होत असताना आता पुणे महानगरपालिका या ठिकाणी ५ कोटी रुपये खर्च करुन मोनोरेल उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी सुमारे ७० खांब उद्यानात रोवले जाणार आहेत. *त्यामुळे उद्यानातील मोकळी जागा मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून त्याची उद्यानात दररोज जाणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण होणार आहे.
कोथरूडमध्ये थोरात उद्यानाच्या जवळूनच खरीखुरी मेट्रो सुरु असताना ही उद्यानात कोट्यावधी रुपये खर्च करून खेळण्यातील मोनोरेल सुरु करण्याचा डाव कशासाठी घातला जात आहे ? या ठेक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यानेच हा प्रकल्प रेटला जात आहे.
मोनोरेल सुरु करण्याची मागणी कोणत्याही स्थानिक नागरी गटाने अथवा नागरिकांनी केलेली नाही. तरी, पुणे महानगरपालिकेने हा उपद्व्याप करू नये. मोनोरेल सुरु करण्यास कोथरूड येथील उद्यानप्रेमी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. त्याची गंभीर दखल पुणे महानगरपालिकेने घ्यावी. तरी, आम आदमी पार्टीचा थोरात उद्यानामध्ये मोनोरेल सुरु करण्यास ठाम विरोध आहे.
कोथरूड येथील सुजाण नागरिकांचा याला होत असलेला विरोध लक्षात घेत पुणे महानगरपालिकेने हा उपक्रम तातडीने थांबवावा. अन्यथा कोथरूड रहिवाशांच्या बाजूने रस्त्यावर उतरुन आम आदमी पार्टीला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.
अतिरिक्त आयुक्त ढाकणे सरांना निवेदन देताना आम आदमी पक्षाचे शिष्टमंडळ - डॉ अभिजीत मोरे, एडवोकेट अमोल काळे, आरती करंजावणे, प्रदीप उदागे.
डॉ अभिजित मोरे (९१५८४९४७८४), अॅड अमोल काळे (९८९०६१६६०२), आरती करंजावणे, प्रदीप उदागे