शिवरायांची राजनीती ही सुदृढ समाज निर्मितीची निती : प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१९ छत्रपती शिवरायांनी रयतेला मोठे केले होते. विकासाची खरीखुरी कृतिशील संधी प्राप्त करून दिलेली होती. तिच्यावरील अन्याय अत्याचाराचे निर्दालन केले होते. रयतेच्या भाजीच्या देठाचेही नुकसान होणार नाही याकडे शिवरायांनी कटाक्षाने लक्ष दिले .त्यामुळे रयतेनेही शिवरायांना आपल्या प्राणापलीकडे प्रिय मानले. म्हणून तर जगाच्या इतिहासामध्ये शिवरायांचा गेली साडेतीन-चार शतके जयजयकार होत आहे. राजा असूनही लोकशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या शिवरायांचा खरा इतिहास शहीद कॉ.गोविंद पानसरे यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेला होता. त्यातून 

शिवाजी महाराजांचा एक राज्यकर्ता म्हणून राज्य, राष्ट्र,धर्म, स्त्री, शेती, व्यापार, अर्थविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो,ते पुस्तक सर्वप्रथम समाजवादी प्रबोधिनीने प्रकाशित केलेले होते. शिवरायांबद्दल तीच भूमिका घेऊन पुढे जाणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. कारण शिवरायांची राजनीती ही सुदृढ समाज निर्मितीची निती होती असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते. प्रारंभी योगशिक्षक प्रकाश मोरे व सुनील परीट यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अन्वर पटेल, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी ,काशिनाथ पाटील ,उदय भस्मे, रियाज मकानदार, दौलत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post