देश एकसंघ ठेवण्यासाठी बहुजनांनी एकत्र येवून हुकूमशाही मोडून टाकली पाहिजे.. सरदार दया सिंह राष्ट्रीय अध्यक्ष
इडिया आघाडी देशाला मजबूत लोकशाही सरकार देणार..मा.आमदार मोहन जोशी
अल्पसंख्याक समाज सुरक्षित ठेवण्याची ग्यारंटी सरकारने दिली पाहिजे ...फिरोज मुल्ला (सर)
प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर :
पुणे :आँल इंडिया पिस मिशन या संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती मा.न्यायाधीश बी.जे कोळसेपाटील, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दया सिंह, मा.आमदार मोहनदादा जोशी,पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांनी देशामधील सद्यपरिस्तिथीवर आपली मते व्यक्त केली
80 कोटी भारतीय 5किलो धान्यासाठी रांगेत उभे आहेत हा कसला देशाचा अमृत काळ आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. भारतासाठी हा अमृत काळ आहे असा दावा केला जात आहे पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आपण कोणता देश बनवला आहे हा प्रश्नच आहे. देशाचे पंतप्रधान मंदिरात उद्घाटनासाठी यज्ञ करत आहेत. एक व्यक्ती म्हणून त्याला कुठलाही आक्षेप नाही. परंतु ज्या देशाने संविधान स्वीकारले संविधानाची शपथ घेतले .त्याच संविधानानुसार तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तर अशा पंतप्रधानाने हे करणे योग्य नाही. देशात विचार करण्यासारखे असे अनेक प्रश्न सध्या उभे टाकले आहेत. संविधानिक देशांमध्ये संसद भवनात उद्घाटनाला लोकशाही देशांमध्ये राजेशाही पद्धतीने शिंगोले प्रतीक मानून त्याची स्थापना होत आहे. अशा पद्धतीने जर देश चालत राहिला तर आपल्याला राजेशाही शिवाय पर्याय राहणार नाही. अशा परिस्थितीला आपण कशी परवानगी देणार आहोत देशातला अल्पसंख्यांक बहुजनवादी समाज हा देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा वैदिक पद्धतीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या मुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एक असुरक्षितता तयार होत आहे.
देशातील नागरिकांना जागृत करण्यासाठी आणि हे प्रश्न देशातील लोकांसमोर मांडून त्यावर चर्चा करण्यासाठी गांधी फाउंडेशन कडून एक यात्रा काढण्यात आली होती ती यात्रा दिल्ली हरियाणा चंदिगड पंजाब मार्ग जम्मू नंतर अमृतसर येथे संपवण्यात आली देशाच्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली त्यानंतर त्यातून येणाऱ्या आव्हानावर सुद्धा चर्चा झाली.