प्रबोधन वाचनालयास विद्यार्थिनींची अभ्यास भेट

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१४,समाजवादी प्रबोधिनी  आणि श्रीमती आ. रा.पाटील कन्या महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत महाविद्यालयातील मराठी विषयाच्या बी.ए.भाग दोन व तीन च्या विद्यार्थ्यांनीनी शासनमान्य अ वर्ग प्राप्त प्रबोधन वाचनालयाला अभ्यास भेट दिली. 

प्राचार्या डॉ.त्रिशला कदम आणि विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही भेट दिली.प्रा. डॉ.प्रियांका कुंभार आणि प्रा. डॉ. प्रतिभा पैलवान यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनीनी प्रबोधन वाचनालयाची संपूर्ण माहिती घेतली. तसे संदर्भ ग्रंथासह साहित्यातील सर्व प्रकारच्या ग्रंथांची व नियतकालिकांची ओळख करून घेतली. वाचनालयाच्या वतीने सौदामिनी कुलकर्णी यांनी सर्वांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.

 प्रसाद कुलकर्णी यांनी ३१ हजारावर पुस्तके व शंभरावर नियतकालिकांनी समृद्ध असलेल्या वाचनालयाच्या विविध विभागांची  माहिती दिली.यावेळी प्रा. डॉ. प्रियांका कुंभार व प्रा.डॉ.प्रतिमा पैलवान यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नंदा हालभावी, अश्विनी कोळी,अंकिता हजारे, रोमा डांगरे, श्रुती रूकडे, धनश्री सावंत, औदुर्या कदम ,सारिका वाघमोडे, सानिया मुल्ला, दिव्या कुलकर्णी ,भाग्यश्री म्हेत्री आदींची उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post