प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- करवीर तालुक्यातील कोगील ब्रु.येथे कोर्टाची नोटीस देण्यासाठी गेलेला बेलिफ प्रकाश यादव यांना मारहाण करून शासकीय कामात अ डथळा आणल्या प्रकरणी रघु आनंदा गणेशाचार्य आणि नंदिनी भिकाजी गणेशाचार्य यांना गोकुळ शिरगांव पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी बेलीफ प्रकाश यादव हे 07 फ़ेब्रु. रोजी आरोपी आणि त्यांचे कुंटुबिय यांना प्रतिवादी असलेल्या केस मध्ये नोटीस देण्यासाठी गेले होते.त्या वेळी आरोपीनी शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करीत धक्काबुक्की करून त्यांचा चष्मा मोडून दुचाकीची मोडतोड करून नोटीस फाडुन जाळून टाकली.आणि परत आल्यास सोडणार नाही अशी धमकी देत शासकीय कामात अ डथळा आणल्या प्रकरणी आरोपीच्या विरोधात गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान बेलीफला मारहाण केल्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयाच्या ठिकाणी न्यायालयान कर्मचारी एकत्रितपणे येऊन निषेध करून शासकीय कर्मचारी यांना संरक्षणाची मागणी करत आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचे जिल्हा बार असोसिएशनकडे मागणी करण्याचे एकमताने ठरले आहे.या वेळी कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत न्यायालयीन कर्मचारी आणि चारही संघटना सहभागी झाल्या होत्या.