विविध राज्यातील २ हजारहून अधिक रोटेरियन झाले होते सहभागी विविध तज्ञांमार्फत तीन दिवसात झाले मार्गदर्शन
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : रोटरी परिवारातील सदस्यांसाठी पर्वणी ठरणारी "आशाये " ही ६५ वी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० ही परिषद कोल्हापूर मध्ये २,३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ अशी तीन दिवस चालली. कोल्हापुरात सुवर्णभूमी लॉन्स,शिरोली जकात नाका या ठिकाणी संपन्न झालेल्या या परिषदेस कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , सावंतवाडी, संपूर्ण गोवा याबरोबरच हुबळी, धारवाड बेळगाव या उत्तर कर्नाटक आदीसह विविध राज्यातील २ हजारहून अधिक रोटेरियन सहभागी झाले होते.या परिषदेत तीन दिवसात विविध तज्ञांमार्फत मार्गदर्शन झाले.ज्याचा उपयोग येणाऱ्या भविष्यकाळात रोटेरियन यांना सामाजिक कार्य करण्यास मोलाचे ठरणार आहे.
परिषदेच्या आज तिसऱ्या दिवशी डॉ.जी. एस .कुलकर्णी यांनी “दीर्घायुष्याचा मंत्र” या विषयावर बोलताना त्यांनी जीवनात सकारात्मक विचारांनी वाटचाल करणे गरजेचे आहे असे सांगून योग्य आहार ,चांगला व्यायाम हे दीर्घायुष्यासाठी महत्वाचे असल्याचे संगितले.
तर संदीप गादिया यांनी “सायबर क्राईम” या विषयावर बोलताना मोबाईल वरून अलीकडे फसवणुकीचे प्रकार खुपच वाढत चालले आहेत. यात आपण इतरत्र मोबाईल चार्जिंगला लावणे टाळावे तसेच चॅटद्वारे, फेसबुक व ब्लूटूथद्वारे स्वतः हॅकर यांना स्वतःची माहिती देत असुन
त्यातूनच आपल्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले जातात म्हणून सावध रहा असे सांगितले.
आणि प्रख्यात लेखक व रिझर्व बॅंकेचे संचालक आशुतोष रारावीकर यांनी "आनंददायी पथप्रकाश" या विषयावर मार्गदर्शन करताना जीवनात वेळ,धन आणि ऊर्जा याचा आयुष्यात योग्य उपयोग केला तर जीवनात यश प्राप्त होईल असे सांगितले. मनशक्ती साठी परमात्मा साधना आणि उपासना महत्वाची आहे. अंधारात उजेड देतो तोच प्रकाश असतो असे सांगून रोटरी करत असलेले काम जीवनाला गरजूंना बळकटी देणारे आहे असे सांगितले.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे गव्हर्नर रो. नासिर बोरसदवाला आणि परिषदेचे चेअरमन रो.राजीव परीख, कॉन्फरन्स कौन्सिलर डॉ. रो.वासुदेव देशिंगकर, सचिव रो. विक्रांत कदम , रोटरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधी हेन्री टॅन (सिंगापूर) आलियन, रोटरी इंटरनॅशनल ग्रॅंट ऑफिसर रेबेका मेंडोजा (अमेरिका ) आदी तीन दिवस परिषदेला खास उपस्थित होतें.आज सन २०२२-२३ या वर्षातील डिस्ट्रिक्ट अवॉर्डचे वितरण झाले.
या परिषदेकरीता डी. वाय. पाटील ग्रुप, भीमा बिजनेस ग्रुप, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, एस.बी रिशेलर्स, श्रीराम फाउंड्री, सरोज फाउंड्री ,मेनन अँड मेनन लिमिटेड, अमृता इंडस्ट्रीज, सुदर्शन जीन्स, माय हुंडाई, ट्रेंडी व्हिल्स( महिंद्रा कार), डॉ. सचिन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचे प्रायोजकत्व लाभले.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी कॉन्फरन्स सचिव प्रसन्न देशिंगकर, खजानिस बी.एस शिंपुगडे, रो.राहुल कुलकर्णी , ऋषिकेश खोत,दिव्यराज वसा, सचिन मालू, दिलीप शेवाळे,श्रीकांत मोरे ,गौरव शहा, बाळासाहेब कडोलकर, मानसिंग पानसकर, शरद पाटील, रो. शरद पै.चंदन मिरजकर, अरविंद कृष्णन,सुजाता लोहिया सिद्धार्थ पाटणकर, विनोद कांबोज, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. दिग्विजय पाटील, राजशेखर संबर्गी, सचिन झंवर, पी एम. कालेकर, सिद्धार्थ डहाळे, प्रदीप पासमल, डॉ. महादेव नरके यांनी अथक परिश्रम घेतले.
आभार परिषद चेअरमन रो.राजीव परीख यांनी मानले.