प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर: अशोकराव माने कॉलेज ऑफ एज्युकेशन, पेठवडगावच्या प्राचार्य डॉ. रेखा निर्मळे आणि प्रा. निगार मुजावर लिखित व वाचनकट्टा प्रकाशित 'संशोधन पद्धती' या पुस्तकाचे प्रकाशन कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, कवी मोहन कवठेकर, विजय कदम, वाचनकट्टा संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम, वाचनकट्ट्याच्या सचिव वनिता कदम आणि लेखिका प्राचार्य डॉ. रेखा निर्मळे व प्रा. निगार मुजावर उपस्थित होत्या.
'संशोधन कार्यपद्धती' हे पुस्तक संशोधनाशी निगडित सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी ठरणार आहे. या पुस्तकात ११०० पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न अंतर्भूत आहेत. शिवाय सर्व विद्यापीठांच्या अभ्यासक्रमास अनुसरून प्रकरणांचा व उपप्रकरणांचा समावेश आहे. एकूणच सर्व विद्यापीठातील शिक्षणशास्त्र, औषधनिर्माण शाखा, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, सामाजिक शास्त्र, भूगोल, गणित, संख्याशास्त्र, वाणिज्य, बी. एस. डब्ल्यू,, एम. एस. डब्लू, इंजिनिअरिंग, एम.बी.ए., पदवी, पदव्युत्तर, पीएच. डी. व संशोधन करणाऱ्या सर्वच स्तरातील अभ्यासकांना उपयुक्त ठरणार आहे असे लेखिका प्राचार्य डॉ. रेखा निर्मळे यांनी सांगितले.