प्रेस मीडिया लाईव्ह :
जीलानी उर्फ मुन्ना शेख :
मांगले गावचे सुपूत्र मा .श्री.संदिप गजानन दिवाण (आयपीएस) यांची पोलीस उपमहानिरीक्षक (डी.आय.जी) पदी बढती झालेबद्दल नागरी सत्कार सोहळा मांगले येथील श्री मंगलनाथ मंदिर येथे पार पडला.
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदिप घुगे यांच्या हस्ते पोलिस उपमहानिरीक्षक संदिप दिवाण यांच्या झालेल्या सत्कार प्रसंगी इस्लामपूर प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,इस्लामपूर पोलीस उपअधिक्षक मंगेश चव्हाण , शिराळा तहसिलदार शामला खोत, शिराळा पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम,ग्रामपंचायत मांगले सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच,संजय जमदाडे,सर्व सदस्य व सर्व ग्रामस्थ, उपस्थित होते