न्हावा-शेवा बंदरातून २ कोटी रुपयांच्या मोरपिसांची तस्करी, डीआरआय विभागाची मोठी कारवाई



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

राज्यातील न्हावा-शेवा बंदरातून मोरपिसांची तस्करी होत असल्याचे प्रकरण समोर आलं आहे. तब्बल २ कोटी रुपयांची मोरपिसांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.महसूल सक्तवसुली संचालनालयाने ही मोठी कारवाई केली आहे. 

२८ लाख मोरपीस जप्त

महसूल गुप्तचर संचलनालय विभागाकडून २८ लाख मोरपीस जप्त केले आहे. न्हावा-शेवा बंदरातून ही मोरपिसांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. २ कोटी रुपयांचे मोरपीस चीनला अनधिकृतरित्या पाठवले जात असल्याचे समोर आले आहे. पायपुसणीच्या नावाखाली ही तस्करी सुरु होती.

न्हावा-शेवा बंदरावर मोरपिसांची तस्करी रोखली

महसूल गुप्तचर संचलनालयाच्या (DRI) पथकाने चीनकडे पाठवण्यात येणारी मोरपिसांची तस्करी रोखली आहे. या पथकाने एकूण २८ लाख मोरपीस जप्त केले आहे. या प्रकरणात पथकाने निर्यातदाराला अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post