प्रेस मीडिया लाईव्ह :
हैदरअली मुजावर : शिरढोण प्रतिनिधी
शिरढोण येथे रमजानशेठ बाणदार विद्यालय जवळ रस्त्यांच्या पुर्व बाजूला नुकतेच बाळासो शेख यांनी ताज स्टेशनरी दुकान सुरू केले होते.रविवारी मध्यरात्री काही भुरट्या चोरांनी संधी साधून दुकानाचे कुलुप तोडून दुकानातील काही रोख रक्कम व काही साहित्य घेऊन लंपास झाले.
बाळासो शेख यांनी सकाळी येऊन पाहताच कुलुप तोडलेले निदर्शनास आले चोरी झालेले समजताच त्यांनी कुरुंदवाड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली.काही दिवसांपूर्वी नांदणी रस्त्यालगत चौधरी यांची घरासमोरील दुचाकी गेली होती.अद्याप या गाडीचा तपास लागला नाही.तसेच ओम पान शॉप मधुन देखिल मध्यरात्री रोख रक्कम तीन हजार पाचशे रुपये नेन्हात आले.आणि काही लोकांच्या घराजवळ लावण्यात आलेल्या वाहनांचे पेट्रोल देखील चोरट्यांनी काढुन नेले.शिरढोण येथे दर गुरुवारी भरत असलेल्या बाजारात देखील पाकीट,रोख रक्कम, मोबाईल माराच्या मध्ये देखील वाढ होत आहे.शिरढोण मधील नागरिक भयभीत झाले आहेत. शिरढोण ग्रामपंचायतीने याकडे अधिक बारकाईने लक्ष ठेवून सी सी टी वी कॅमेरे चालू ठेवावे व कुरुंदवाड पोलिस प्रशासनाने गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.