प्रेस मीडिया लाईव्ह :
सांगली : सांगली जिल्ह्यातील भेसळयुक्त शिंदी विक्रीची सर्व दुकाने बंद करावीत या मागणीसाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना जिल्हाध्यक्ष सत्वशील पाटील हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणाचा आज सातवा दिवस होता
दिनांक 22 फेब्रुवारी 2024 पासुन संपूर्ण सांगली जिल्ह्यातील भेसळयुक्त शिंदी ताडी विक्रीची दुकाने बंद करावीत या मागणी साठी सत्वशील पाटील हे उपोषणाला बसले आहेत या आंदोलनाची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने
मिरज एस टी स्टॅड ऐरिया येथील ताडी रिटेल शॉप , सांगली शिवाजी नगर येथील आमगोंडा सिदगोंडा जालीहार यांचे ताडी रिटेल शॉप लायसन्स नं 2 व सलगरे ता मिरज येथील मल्लेश इलीगार यांचे ताडी शॉप आदी भेसळयुक्त शिंदी विक्री दुकाने ची तपासनी करून ताडी या अन्नद्रव्यांची नमुने गोळा करून 38 लिटर साठा जप्त करण्यात येऊन ते नष्ट केले आहे संबंधीत शिंदी विक्री चे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे असे लेखी पत्र आंदोलक शिवश्री सत्वशील पाटील यांना सहाय्यक आयुक्त (अन्न) रावसाहेब सम्रुदे यांनी दिले आहे . तथापी राज्य उत्पादन शुल्क विभागने या वर कोणतीही कारवाई केलेली नाही यावरून भेसळयुक्त शिंदी विक्रेते व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचे सामान्य नागरीकांतून प्रतिक्रिया उमटत आहेत .