अग्निशमन दलाला व खालापूर पोलीस स्टेशन यांना आग विझवण्यात यश आले आहे
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
चौक रेल्वे स्टेशन रेल्वे ट्रॅक लाईन वर उभी असलेली इंधन मालवाहतूक गाडीला साधारण 11 ते 12 च्या दरम्यान अचानक इंधन टाकी मधून धुर येऊ लागला व आगीचा भडका उडाला त्या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरातील तिथे असलेले मोलमजुरी कामगार वर्ग यांनी जीव मुठीत घेऊन तेथून पळ काढला.
हे दृश्य मी पाहत होतो आग ही इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे लागल्याचे समजते , या बाबत मी स्वतः खालापूर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून शिंदे साहेब यांना घटनेची सर्व हकीगत सांगितले.त्यांनी काही वेळातच अग्निशमन दलाला पाचारण करून ती आग आटोक्यात आणली खालापूर पोलीस स्टेशन व चौक पोलीस स्टेशन व अग्निशमन दल व तेथील सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे उद्धव गटाचे श्याम साळवी यांना मी डोळ्यासमोर धावपळ करत असताना पाहिले तसेच बीजेपीचे सुधीर ठोंबरे ही त्यावेळेस तिथे उपस्थित होते.