प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : प्रतिनिधी :
पुणे.. छत्रपती शिवाजी महाराजांना पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मानाचा मुजरा करण्यात आला
छत्रपती शिवरायांनी रयतच राज्य सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभ केल कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ दिला नाही स्त्रियांवर कधी अन्याय हैऊ दिला नाही आणि जर झालाच तर गुन्हेगाराला कडक शासन केले शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठावरही अन्याय होऊ दिला नाही कधी जातीवाद निर्माण होऊ दिला नाही सर्व जाती धर्माचे लोक छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये गुन्या गुविंदा नांदत होते छत्रपती शिवरायांच राज्य खरचं सुजलाम शुपलाम होत
परंतु आताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये तसी परीस्थिती दिसत नाही सर्व ठिकाणी अन्याय अत्याचार जातीवाद निर्माण होतोय स्त्रियां सुरक्षित नाही शेतकरी आत्महत्या करतायत सगळीकडे भयावह वातावरण झालं आहे प्रत्येकजन न्यायाच्या प्रतिक्षेत आहे म्हणून पुन्हा छत्रपती शिवरायांचे राज्य येणे काळाची गरज आहे असे मत फिरोज मुल्ला(सर) यांनी व्यक्त केले यावेळी प्रदेश महिला कार्यध्यक्षा सिंधुताई तुळवे,पुणे शहर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे,महिला पुणे शहर उपाध्यक्षा विजयाताई खटाळ, विनोद सोनवणे, विजय सरोदे, उत्तम गायकवाडआदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते