प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : फिरोज मुल्ला सर :
पुणे : पुणे शहरातील नियमभंग करणाऱ्या पब, बार, रेस्टो बार, रूफटॉप हॉटेल आणि क्लब चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, सीआरपीसी १४४ चा आदेश काढण्यात आला आहे. यामध्ये बार, परमिट रूम, रेस्टॉरंट, पब, रुफटफ रेस्टॉरंट यांना नोटीस बजावून मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार आहेत. रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडला, तर संबंधित हॉटेलवर कडक कारवाई करण्यात येईल.
ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी हॉटेल चालकांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या मार्गावर, तसेच बाहेर पडण्याच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. प्रसाधनगृह वगळून हाॅटेलमधील सर्व भागात सीसीटीव्ही बंधनकारक आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणातील दोन डीव्हीआर यंत्रे लावणे गरजेचे आहे.
सीआरपीसी कलम १४४ म्हणजे फौजदारी दंड संहिता. या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असेही म्हणतात. यानुसार कलम १४४ चे उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकतात. याअंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.