प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :- कसब्यात असलेल्या मेट्रो स्थानकाला प्रशासनाकडून बुधवार पेठ नाव देण्यात आले होते , शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी मेट्रो प्रशासनाला दोन वर्षा पूर्वी नाव बदलणे संधर्भात पत्र दिले असून ही स्टेशनला बुधवार पेठ स्टेशन आसा बोर्ड लावण्यात आला होता . या विरोधात कसबा मतदारसंघातील संतप्त शिवसैनिक व स्थानिक नागरिकांनी तो बोर्ड तोडून आज आखेर शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते कसबा पेठ स्टेशन” आसा बोर्ड लावला .
मेट्रो प्रशासनाकडून कसबा पेठेत होऊ घातलेल्या स्टेशनला बुधवार पेठ स्टेशन नाव बदलून कसबा पेठ स्टेशन हे नाव दिले जात नाही तोवर कासबावासी शांत बसणार नाही असे मुकुंद चव्हाण म्हणाले .
यावेळी आंदोलनात शहर प्रमुख संजय मोरे, कसबा विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण,अनिल जाधव,नागेश खडके, शुभम दुगाणे,राजेंद्र शिंदे, नंदु काळे, जुबेर तांबोळी,कुणाल शेलार, बकुळ डाखवे,गणेश आगरकर,संजय पायगुडे, विनायक गायकवाड,प्रमोद रसाळ,शिरीष गायकवाड,अशोक मांढरे,बाळासाहेब मेमाणे, विनायक मेमाणे,बाळासाहेब बोराडे,रमेश साळुंके,राजाभाऊ नानेकर, सुनील वैद्य,सतीश रुके, विजय जगताप,सुरेश आढाव ,ओमकार वैद्य, नीलेश पाटसकर, प्रशांत कोलते,महेश जगनाडे
महिला आघाडी :- गौरी चव्हाण ,निकिता मारटकर , स्वाती ठकार,मीनाक्षी हरिश्चंद्र उपस्थित होते.
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख शिवसेना पुणे .