धर्माच्या ज्ञाना बरोबर अत्याधुनिक शिक्षण घेण्यासाठी मज्जीद, मदरसे मुस्लिम विद्यार्थ्यांत्या करिता केंद्र बनवावे-फिरोज मुल्ला (सर )



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : प्रतिनिधी :

   पुणे.. शिक्षण हक्क मंचाच्या वतीने मज्जीद, मदरसे हे शिक्षण घेण्यासाठी उन्नतीचे केंद्र असावेत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे असी मागणी अध्यक्ष मतीन मुजावर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून करण्यात आली 

       पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत असताना संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) म्हणाले मुस्लिम समाज शिक्षणात फार मागे आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात मागास आहे सच्चर समीती, रंगनाथ मिश्रा समीती,आब्दुर रहेमान कमीटी याचा अहवाल सरकारला देण्यात आला आहे . 


 परंतु कायद्याने मिळणार शैक्षणिक 5% आरक्षण सरकार व राज्यकर्ते देण्यास गंभीर होत नाही एकीकडे शिक्षण महाग होत चालल आहे ते सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना व पालकांना न परवडणारे आहे त्यात छोट्या छोट्या घरांमध्ये आभ्यास करण्यासाठी प्रचंड आडचणीला सामोरे जाव लागत आहे त्याकरिता जर मज्जीद, मदरसे या ठिकाणी आभ्यासिका सुरू करून मुस्लिम समाजातील मुलांचे शिक्षण दर्जेदार होईल आणि त्यांचे शैक्षणिक भविष्य उजवल होण्यास मदतच होईल आणि त्यामध्ये काही गैर नाही तर मुस्लिम समाजाने एक पाऊल पुढे येऊन शिक्षण क्षेत्रातपण क्रांती करावी आणि मुस्लिम समाजातील मुलांना IAS,IPS, डॉक्टर, वकील, इंजीनियर, प्रोपेसर असे उच्चशिक्षित करून आर्दश घडवावा असे संबोधित केले. यावेळी वाहीद बियाबानी सर,अकबर मेमन, फिरोज नरसंगी,हासिम शेख,साजीद शेख, खिशाल जाफरी, जुबेर मेमन,आदी मान्यवर उपस्थित होते सुत्रसंचालन चाँदभाई बलबट्टी यांनी केले

Post a Comment

Previous Post Next Post