प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर
पुणे : पार्किंगच्या वादातून एका महिलेला तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, महिला घरात पळून गेल्याने तिचा जीव वाचला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात पार्किंगच्या वादातून हा वाद झाला आहे . दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने सुरवातीला महिलेच्या चारचाकी गाडीची तोडफोड करून. गाडीच्या काच्या फोडण्यात आल्या. त्यानंतर महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महिला घरात पळून गेल्याने ती वाचली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश राजे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. महेश राजे व या प्रकरणातील आरोपी हे एकाच परीसरात राहतात. त्या दोघांच्यामध्ये पार्किंगवरून वाद सुरू होता. 17 फेब्रुवारी रोजी त्यांच्यात वाद भडकला आणि 13 जणांनी येऊन राजे यांची एक चारचाकी गाडीची तोडफोड करून नुकसान केले. पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.