१४ फेब्रुवारी रोजी ‘मातृ-मातृत्व दिन’ खरा प्रेमदिन साजरा करावा
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : खोट्या आरोपाखाली जोधपूर तुरुंगात ठेवलेले ८६ वर्षीय संत श्री आशारामजी बापू यांची प्रकृती चिंताजनक आहे. 13 जानेवारी पासून जोधपूरच्या एम्स हॉस्पिटलमध्ये कार्डियाक आयसीयूमध्ये आहेत. तुरुंगात जाण्यापूर्वी वयाच्या ७४ व्या वर्षी बापू आसारामजींना केवळ ट्रायजेमिनल न्युराल्जिया आणि पाठदुखीचा त्रास होत होता.आता वयाच्या 86 व्या वर्षी ते हृदयविकार, प्रोस्टेट वाढणे, संधिवात आणि अशक्तपणा इत्यादी नवीन आजारांनी ग्रासले आहेत. एम्सच्या अहवालानुसार, त्याच्या हृदयात 3 गंभीर ब्लॉकेज आहेत (99%, 90% आणि 75%). तसेच हिमोग्लोबिनची पातळी सतत घसरत असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे. त्यांची गंभीर शारीरिक स्थिती पाहता पॅरोलसाठी नुकताच दाखल केलेला अर्ज आजाराच्या तीव्रतेकडे दुर्लक्ष करून रद्द करण्यात आला. बापूजीना तणावमुक्त वातावरणात अनुकूल, उत्तम व त्वरित योग्य उपचार मिळावेत अशी मागणी संत श्री आशारामजी आश्रम अहमदाबाद सत्संग वक्ता श्री रामानंद जी आणि महिला उत्थान मंडल अहमदाबाद सत्संग वक्ता साधवी रेखा बहन जी यांनी केली.
श्री योग वेदांत सेवा समिती आयोजित मातृपितृ पूजन दिवस महती आणि संत श्री आशारामजी बापू यांच्या आरोग्याची सद्यस्थिती संदर्भात पुणे पत्रकार भवन याठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत श्री आशारामजी आश्रम महाराष्ट्र राज्य महासंचालक श्री सत्येंदर कालियाजी, श्री योग वेदांत सेवा समिति पुणे अध्यक्ष श्री चेतन चरवड, समस्त हिंदू आघाड़ी पुणेचे ऍड.मोहन डोंगरे, हिंदू जनजागृती समिती पुणेचे पराग गोखले, स्वराज श्रमिक सेना सुजीत ढंक आदी उपस्थित होते.
बापू आशारामजींनी आपले संपूर्ण आयुष्य सनातन धर्माच्या प्रचारासाठी आणि राष्ट्राच्या उत्थानासाठी वाहून घेतले. जात, धर्म, पंथ, सांप्रदाय असा कोणताही भेदभाव न करता त्यांच्या विविध परोपकारी सेवेचा लाभ कोट्यवधी लोकांनी आजवर घेतला. जनसामान्यांची प्रचंड आस्था, श्रद्धा आणि प्रार्थना बापू आशारामजी यांच्या पाठीशी आहे. सद्यस्थिती अनेक आजारांनी ग्रस्त असताना त्यांना अनुकूल, उत्तम व त्वरित योग्य उपचार मिळावेत अपेक्षित होते पण तसे होताना दिसत नाही. खरे तर बापूजींच्या खटल्यातील वास्तव तथ्ये आणि पुरावे पाहता, त्यांना निर्दोष सोडले पाहिजे असे अनेक न्यायशास्त्रज्ञांसह आद्य शंकराचार्य, साधू - संत आणि आमच्या सर्व साधकांची मागणी असल्याचे मत श्री रामानंद यांनी व्यक्त केले.
2022 मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, 'अस्वास्थ्याच्याआधारावर कैद्याला अंतरिम जामीन देताना उदारता पाळली पाहिजे. हा प्रत्येक नागरिकाचा एक संवेदनशील मूलभूत अधिकार असतांनाही बापू आशारामजींच्या मूलभूत अधिकारांचे खुलेआम उल्लंघन होतांना पाहणे हे अतिशय दुर्दैवी आहे. माजी मंत्री गायत्री प्रजापती यांच्यावर पॉक्सो कायद्याच्या कलमाखाली आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल असतांनाही आधी तब्येतीच्या कारणास्तव आणि नंतर त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी जामीन मंजूर होतो. त्याचप्रमाणे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला, महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक अशी अनेक उदाहरणसह घोटाळे, खून, बॉम्बस्फोट यांसारख्या जघन्य घटनांमधील आरोपी आणि गुन्हेगारांनाही दिलासा दिला जातो. पण खोट्या पॉक्सो कायद्याच्या कलमाखाली निरपराध संत श्री आसारामजी बापूंना त्यांच्या इच्छेनुसार योग्य उपचार मिळण्यापासून वंचित का ठेवले जात आहे ? हे त्यांच्या मानवी हक्कांचे आणि घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन नाही का? असा प्रश्न उपस्थित करत सर्व साधक, महिला संघटना आणि अनेक हिंदू संघटनांसह श्री योग वेदांत सेवा समिती मागणीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. आदरणीय बापूजींना लवकरात लवकर योग्य त्या ठिकाणी आवश्यक असे योग्य वैद्यकीय पध्दतीने तातडीने उपचार मिळावेत. अन्यथा, लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभे करावे लागेल असे मत महिला उत्थान मंडल अहमदाबाद सत्संग वक्ता साधवी रेखा बहनजी यांनी मांडले.