येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये गुरुवारी सकाळी कैद्यांनी कारागृह कर्मचारी शेरखान पठाण यांना मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या शेरखान पठाणला कारागृह रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कारागृह प्रशासनाने या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक १ मध्ये गुरुवारी कारागृह कर्मचारी शेरखान पठाण आणि कैदी विकी कांबळे आणि प्रकाश रेणुसे यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या नंतर या दोन कैद्यांसह इतर कैद्यांनी पठाण यांच्यावर हल्ला केला. या घटनेत पठाण यांच्या डोळ्याच्या खाली दुखापत झाली असून उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे.शेरखान पठाण वर कारागृह रुग्णालयात उपचार सुरू आहे . या घटनेचा अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.