'इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स कडून गौरव
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : द इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे) च्या पुणे शाखेला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.हॉटेल ली मेरिडियन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष योगेश ठक्कर हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाचशेहुन जास्त सभासद असलेल्या विभागात पुणे चॅप्टर ला २०२३-२४ चा सर्वोत्तम चॅप्टर म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
इशरे ,पुणे चॅप्टर तर्फे हा पुरस्कार अध्यक्ष नंदकिशोर कोतकर आणि नियोजित अध्यक्ष आशुतोष जोशी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष योगेश ठक्कर यांच्याकडून स्वीकारला. इशरेची संपूर्ण देशात वाढ, प्रगती आणि समृद्धी करण्याकरिता इशरे पुणे चॅप्टर चे माजी अध्यक्ष रमेश परांजपे यांना उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच इशरे पुणे चॅप्टरचे माजी अध्यक्ष जयंत देशपांडे, दीपक वाणी, वीरेंद्र बोराडे, सदस्य सौ अनुश्री रिसवाडकर आणि सुबोध मुरकेवार याना पुणे चॅप्टर करीता उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी या कार्यक्रमात विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला इशरे पुणे चे नंदकिशोर माटोडे, चेतन ठाकूर, सुभाष खनाडे, अमित गुलवाडे, उल्हास वटपाळ ,विमल चावडा , शामकांत मिराशी ,श्री .शशीधर , देशांतर्गत आणि आंतराष्ट्रीय इशरे चॅप्टर चे १०० हुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. इशरे मुख्यालयाचे पंकज धारकर ,अनुप बलानी , मनीष गुलालकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.