जागरुकता : महाराष्ट्रातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्था यामध्ये झिरो कार्बन एमिशन संकल्पना राबविण्यात यावी .. डॉ. तुषार निकाळजे

जागरुकता :

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व भारतामध्ये झिरो कार्बन एमिशन ही संकल्पना राबविली जात आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील विद्यापीठे, महाविद्यालय  व शिक्षण संस्था यामध्ये ही संकल्पना राबविण्याची विनंती मा. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना ईमेलद्वारे पुण्यातील संशोधक व नागरिक असलेले डॉ. तुषार निकाळजे यांनी केली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरू  व मा. कुलसचिव यांना देखील या ईमेलची प्रत दिली आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन दि. 10 फेब्रुवारी 2024 रोजी साजरा होत आहे फक्त याच दिवशी विद्यापीठाची मुख्य इमारत व प्रशासकीय इमारत यांना विद्युत रोषणाई करावी  अशी विनंती डॉ. तुषार  निकाळजे यांनी केली आहे. तसेच जेवणाच्या सुट्टीमध्ये काही विभागांमध्ये लाईट व पंखे चालू असल्यास ते देखील बंद करण्यात यावेत व ज्या ठिकाणी कर्मचारी किंवा अधिकारी जेवण करत असतील अशाच ठिकाणचे लाईट व पंखे चालू ठेवावेत, अशीही विनंती करण्यात आली आहे.

 या संकल्पनेचा वापर विद्यापीठे, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था यांच्या मूल्यांकनाच्या वेळीदेखील उपयुक्त ठरू शकतो. या अनुषंगाने बेंगलोर येथील नॅक मूल्यांकन कार्यालयास सदर पत्र पाठविले आहे. तसेच वीज बिलापोटी येणारा खर्च हा विद्यार्थी हीतासाठी  वापरता येणे शक्य होईल, असे पत्रात नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post