प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : आम आदमी पार्टीच्या वतीने निगडी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा. राज्यात सातत्याने होत असलेल्या बेछूट गोळीबाराच्या घटना व बिघडलेली कायदा व सुव्यवस्था याविरुद्ध आज उद्योगनगरी पिंपरी चिंचवड येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. हा मोर्चा आकुर्डी विठ्ठल मंदिर ते अप्पर तहसील कार्यालय निगडी येथे काढण्यात आला .
आपचे शहर उपाध्यक्ष संतोष इंगळे , सचिन पवार, वैजनाथ शिरसाठ, अशोक लांडगे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मीनाताई जावळे, पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, पुणे जिल्हाध्यक्ष अमोल देवकाते यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.. २ किलो मिटर पायी चालत मोर्चा काढला, भगवान राम आणि हनुमानाची प्रतीकात्मक यात्रा केली आणि शेवटी प्रभू रामाने फडणवीस, शिंदे आणि अजित पवार सरकारवर बाण मारून निषेध केला.
यावेळी आम आदमी पार्टी प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत, आप प्रदेश सचिव सागर पाटील, आप प्रदेश पदवीधर आघाडी अध्यक्ष चेतन बेंद्रे, शहर अध्यक्ष मिनाताई जावळे, प्रवक्ते धनंजय बेनकर, प्रवक्ते प्रकाश हागवणे, पुणे महिला आघाडी अध्यक्षा सुरेखा भोसले आदी पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनाम्याची मागणी केली..
यावेळी, आपचे कमलेश रनवरे, स्मिता पवार, सरोज कदम, अजय सिंह, सुरेश भिसे, प्रशांत कोळवले, राहुल वाघमारे, ब्रह्मानंद जाधव, गोविंद माळी, अभिजीत सुर्यवंशी, सुरेंद्र कांबळे, कल्याणी चाकणे, स्वप्निल जेवळे, शुभम यादव, राज चाकणे, मिलिंद सरोदे, ॲड.गुणाजी मोरे, अमित मस्के, सय्यद अली, अक्षय शिंदे, सतीश यादव, किरण कांबळे, उमेश बागडे, अनिश वर्गीस, बालाजी कंठेकर, विक्रम गायकवाड, मयूर कांबळे, विजय लोखंडे, संजय कोने, शंकर थोरात, प्रशांत कांबळे, ॲड.अमित कांबळे, पद्ममा साळुंखे,
नौशाद अंसारी, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, शीतल कांडेलकर, संतोष काळे, शाहीन अख्तर, अख्तर खान, अनिल कोंढाळकर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.