प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : संपूर्ण शहरात खळबळ माजवणारे देहूरोड पोलीस स्टेशन लाच प्रकरणी पोलिसांवर कारवाई करणेबाबत अपना वतन संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले होते.
आज दिनांक २२/०२/२०२४ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयावर आंदोलन आयोजित करण्यात आले . पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्याशी अपना वतन संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. संघटनेच्या मागणीनुसार दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात आलेली आहे . तसेच पोलिसांच्या तक्रारी बाबत सर्व पोलीस स्टेशनला सूचना करण्यात येतील . तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले. यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख , कोषाध्यक्ष राजू शेरे , महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर , शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा , तौफिक पठाण , प्रमोद शिंदे , अब्दुल अजीज शेख , बाळू शिंदे , उस्मान शेख , किसन शिरफ़ुले , गणेश जगताप आदीजण उपस्थित होते .
पिंपरी चिचंवड पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केल्याने अपना वतन संघटनेच्या वतीने पोलीस उपायुक्त बापू बांगर व पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांचा सत्कार केला .