प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२४) शिक्षण प्रसारक मंडळींच्या यमुना नगर, निगडी येथील शाळेत शिवजयंती निमित्त सोमवारी चित्तथरारक अश्वारोहण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्या, पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत अश्वारोहण प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली
तत्पूर्वी शि. प्र. मंडळी नियामक मंडळ सदस्य पराग ठाकूर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी जीवनातच विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचे गुण आत्मसात केले पाहिजेत. तसेच भावी पिढी व समाज सुसंस्कृत बनवण्यासाठी तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये शिवाजी महाराज जन्माला यावे असे वाटत असेल तर आताच्या प्रत्येक मातांनी व शिक्षकांनी जिजाऊ होणे गरजेचे आहे असे सांगितले.
यावेळी मराठी व इंग्रजी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, ढोल ताशा यांचे प्रात्यक्षिके सादर केली.
शाहीर चैतन्य जोशी आणि शोभा जोशी यांनी शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा पोवाडा सादर केला त्याला ढोलकीची साथ उद्धव गुरव यांनी दिली.
शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, मुख्याध्यापक रविंद्र मुंगसे, मुख्याध्यापिका सविता बिराजदार आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शितल महांकाळे, प्रार्थना रमा जोशी, स्नेहल देशपांडे यांनी गायली, आभार मीनल बोकील यांनी मानले.
------------------------------------