शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील "शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन -अध्यापन केंद्रांना भेटी "


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, "कॉलेज ऑफ एज्युकेशन "(बी.एड्.) पेठ वडगाव शैक्षणिक वर्ष  2023-24  मधील  "शाळा व नाविन्यपूर्ण अध्ययन -अध्यापन केंद्रांना भेटी " या बी.एड. द्वितिय वर्षातील सेमिस्टर चार मधील प्रात्यक्षिकांतर्गत माननीय प्राचार्या सौ.आर.एल. निर्मळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली "*राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढवळी*   " या ठिकाणी भेट देण्यात आली.

त्यामध्ये सायन्स लॅब,  केमिस्ट्री, फिजिक्स,बायोलाॅजी,भाषा प्रयोगशाळा,आर्ट ॲन्ड क्राफ्ट रूम इत्यादी विषयी माहिती घेतली.सर्व भौतिक सुविधा व डिजिटल क्लासरूम व अध्ययन अध्यापनाची अद्ययावत साधने यांची ओळख करून घेतली.११वी १२वी साठी विशेष अभ्यासिका घेण्यात येतात. सर्व क्लासरुममध्ये पुस्तक पेटी व बचत बॅंकची व्यवस्था करण्यात आली आहे.विध्यार्थ्यांसाठी प्ले ग्राऊंड,बाग व विविध खेळांच्या सहित्यांची माहिती दिली.लायब्ररी, कंम्प्युटर लॅब, कार्यालयीन कामकाज याचीही माहिती घेतली.तेथिल विशेष व आदर्श शिक्षक यांच्या मुलाखती घेतल्या . 

सेमिनार हॉल, प्लॅस्टिक मुक्ती, गांडूळ खत प्रकल्प, कंपोस्ट खत प्रकल्प , खुली व्यायाम शाळा, परस बाग, सर्व प्रकारची खेळाची मैदाने, वाचन कोपरा, विशेष अशी नाविन्यपूर्ण गणित प्रयोगशाळा अशा विविध सोयी सुविधा तेथे आहेत.या प्रात्यक्षिकासाठी शाळेतील कोळेकर मॅडम, चव्हाण सर, संदीप पाटील सर,व मुख्याध्यापक सोनावणे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.शाळेची जेवण व्यवस्था,मेस कामकाज पाहण्यात आले.तेथील मुख्याध्यापकांनी डिजिटल फलकाच्या वापराबाबत अद्ययावत ज्ञान दिले..

या प्रात्यक्षिकासाठी प्रा. शिरतोडे व्ही.एल. यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच प्रा.सोरटे, प्रा.सावंत,प्रा. पवार मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले. या भेटीस प्राध्यापिका शिरतोडे मॅडम, प्रा. सोरटे सर, प्राध्यापिका सावंत मॅडम,  प्राध्यापिका पवार  मॅडम, ग्रंथपाल चौगुले व पाटील मॅडम व बी.एड्. द्वितीय वर्षातील छात्राध्यापक व छात्राध्यापिका उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post