प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड) पेठ वडगाव. या ठिकाणी दिनांक 3 फेब्रुवारी 2024 वार शनिवार रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड) पेठ वडगाव. या ठिकाणी दिनांक 3 फेब्रुवारी 2024 वार शनिवार रोजी कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आले .
बीएड कॉलेज कडून या कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन केले होते अनेक शाळांनी यामध्ये सहभाग घेतला. कॅम्पस इंटरव्ह्यू कार्यक्रमास साठी प्रमुख पाहुणे श्री. एम . डी.पाटील सर संस्थापक अध्यक्ष कॅप्टन जी .बी .पाटील विद्यालय कोडोली. तसेच उपस्थितीमध्ये श्री डी.बी. पाटील सर मुख्याध्यापक कॅप्टन जे .बी .पाटील विद्यालय कोडोली. तसेच प्राध्यापक पी बी पवार सर इंदिरा गांधी माध्यमिक व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव. प्राध्यापक श्री एस .एम .पायमल सर श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज पेठ वडगाव. इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला .
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेल्या कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएड पेठ वडगाव च्या प्राचार्या डॉ. आर.एल.निर्मळे मॅडम यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू साठी मार्गदर्शन केले. तसेच प्लेसमेंट सेल चे प्रमुख प्राध्यापक श्री. सोरटे एस. के. यांनी नियोजन केले तसेच या कार्यक्रमासाठी कॉलेजमधील प्रा.शिरतोडे मॅडम ,प्राध्यापिका सावंत मॅडम ,डॉ. पवार मॅडम आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते .त्याचबरोबर आमच्या कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिकत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी इंटरव्ह्यू दिला .तसेच माजी विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते एक वेगळा उपक्रम आमच्या कॉलेजमध्ये राबविला यातून अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.