अंतरवासिता टप्पा क्रमांक एक ग्रुप क्रमांक एक चा श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव या ठिकाणी सांगता समारंभ संपन्न झाला


प्रेस मीडिया लाईव्ह :

श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित, कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी.एड ) पेठ वडगाव. या ठिकाणी दिनांक 22/02/2024 वार गुरुवार रोजी अंतरवासिता टप्पा क्रमांक एक ग्रुप क्रमांक एक चा श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव या ठिकाणी सांगता समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. 


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव चे मुख्याध्यापक डॉ.सचिन कोंडेकर सर. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड पेठ वडगाव कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर आर. एल निर्मळे मॅडम तसेच गट मार्गदर्शक प्राध्यापिका सावंत ए.पी, प्राध्यापक श्री सोरटे एस .के, प्राध्यापिका सौ शिंदे आर .डी मॅडम तसेच छात्र मुख्याध्यापक आणि सर्वच छात्र आध्यापक इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय चे सर्व विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सूर्यवंशी आणि निवेदिता पाटील यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली आंतरवासिता टप्पा क्रमांक एक मध्ये मुलांनी जे सहशालेय उपक्रम घेतले होते त्यामध्ये क्रीडा स्पर्धा , बौद्धिक स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याचबरोबर सर्व छात्र अध्यापकांनी हे शाळेमध्ये आलेले अनुभव व्यक्त केले.त्यानंतर छात्र मुख्याध्यापक सुप्रिया गिरी गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

 प्रमुख पाहुणे श्री सचिन कोंडेकर सर यांनीही आमच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर आमच्या कॉलेजच्या प्राचार्या डॉ. आर . एल निर्मळे मॅडम यांचेही भाषणातून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. छात्र अध्यापक अपर्णा काटकर यांनी  आभार मानले अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post