प्रेस मीडिया लाईव्ह :
श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप, संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी एड्.) पेठवडगाव या महाविद्यालयाअंतर्गत शनिवार दिनांक 24/02/2024 रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा (IQAC) तर्फे राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारचा विषय "Cyber Crime Awareness" हा होता. वेबिनारचे प्रमुख वक्ते महेश भिकाजीराव चव्हाण, पोलीस निरीक्षक, केंद्रीय अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, पुणे हे होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ.सौ. निर्मळे आर. एल .होत्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ.शिरतोडे व्ही.एल.यांनी केले तसेच पाहुण्यांची ओळख प्रा. सौ. सावंत ए.पी.यांनी केली.आदरणीय PI महेश चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, त्यांनी ऑनलाईन पद्धतीने तरुणांशी वाढत्या सायबर क्राईम विषयी संवाद साधला . यामध्ये गुन्हे कसे घडतात , आपण कसे या गुन्ह्यांना बळी पडतो याविषयी सांगताना त्यांनी विविध उदाहरणांचा वापर केला . सायबर गुन्ह्यांमधुन आपण कसे बाहेर पडू शकतो, पोलिस , बँक आपल्याला याबाबत कशी मदत करू शकतात ; कोणतेही ॲप डाऊनलोड करताना काय दक्षता घ्यावी व विविध ऑनलाईन कार्यामध्ये कशी दक्षता घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना गोपनीयता कशी बाळगता येईल तसेच हेल्पलाईन नंबर यावर चर्चा केली. तरुणांनी सतर्क राहून कामकाज केले पाहिजे असे आवाहन त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून केले. सायबर क्राईम म्हणजे काय व ते कोण कोणत्या बाबतीमध्ये घडू शकते व त्या प्रत्येक बाबतीमध्ये सामान्य व्यक्तींनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती सांगितली.या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.पवार ए. आर.यांनी मानले. या वेबिनारसाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. शिस्तबद्ध वातावरणात हे वेबिनार पार पडले तसेच सहभागींना ऑनलाईन प्रमाणपत्रही देण्यात आले.वेबिनार व्याख्यान व चर्चा अशा स्वरूपात राबविण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सायबर क्राईम विषयीच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. अशाप्रकारे हा राज्यस्तरीय वेबिनार संपन्न झाला.