प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
पनवेल : चिपळे ग्रामपंचायत हद्दीतील गावांसाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे, चिपळे ग्रामपंचायत हद्दीतील बोनशेत, विहिघर, कोप्रोली, चिपळे, भोकरपाडा गावांसाठी व आदिवासी वाडींसाठी १६ कोटी ३२ लाख रुपये खर्चाच्या कामाला ७ फेब्रुवारी २०२३ मध्ये मंजुरी मिळाली. छोटा मोरबे धरणातून पाईपलाईन १० किलोमीटरचा प्रवास करून आधी कोप्रोली या ठिकाणी नंतर पुढे पाण्याच्या टाकीत आणि नंतर अन्य विभागात पाणी वितरित होणार आहे. या कामावरून भाजप आणि शेकापमध्ये श्रेयवाद होत आहे. त्याला शेकापचे विलास फडके यांनी उत्तर दिले आहे
पनवेल तालुक्यातील चिपळे ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन ही योजना राबवली जात आहे. मात्र काही लोकांकडून या योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकताच केला होता, मात्र सदर आरोप हा बिनबुडाचा असून ज्या योजनेसाठी गेली ३ वर्षे पाठपुरावा केला, योजनेचे पैसे खर्च केले. जनतेसाठी केलेल्या कामांचे कधी कुठे बॅनर देखील लावले नाही, आणि कधी प्रसिद्धी नाही केली, मात्र ज्यांनी ३ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर त्याला श्रेय घेण्याचे अधिकार नाहीत का ? असा उलट सवाल करीत विहिघरचे माजी सरपंच तथा शेकापचे रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य विलास फडके यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या योजनेसाठी स्वतःची जागा दिली असल्याचे विलास फडके यांनी सांगितले.
विलास फडके यांनी सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर हे कार्यकर्त्यांच्या ऐकण्यावरून ते आपली भूमिका मांडत आहेत, मात्र त्यांनी प्रत्यक्षात या कामाच्या सुरुवातीपासून कोण कोण काम करीत आहे, याची योग्य माहिती घेवून श्रेय कुणी घ्यावे हे ठरवावे. कोप्रोली, विहिघर, बोनशेतमध्ये जास्त पाणीटंचाई आहे. आम्ही एकाही नागरिकांकडून लोकवर्गणी 10 टक्केपैकी एक रुपयाही जमा केला नसतानाही नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वक्तव्यातून केलं जात आहे. यावेळी वस्तुस्थिती पाहून आमदारांनीआपले मत मांडले पाहिजे असे विहिघर येथील विलास फडके यांनी म्हटले आहे.
चौकट
मी 5 गावांना पाणी मिळावे यासाठी गेली अडीच ते 3 वर्षे काम करत असून येथिल भाजपच्या लोकांना याबाबद्दल काहीही माहिती नव्हती. मी स्वच्छ काम करत असून दिवस रात्र देखील काम करतो. निवडणुका जवळ आल्याने आता आपला कसं व्हायचं त्यामुळे ते अशी नाटकं करत आहेत. पाच गावांचा पाण्यासाठी सर्व्हे झाला. त्यानंतर 2023 मध्ये कामाला मंजुरी मिळाली. मी फक्त जनतेसाठी काम करतोय. येथील नागरिकांना त्यांच्या स्वप्नातील पाणी मिळणार आहे. सोसायटीतील नागरिक सुज्ञ आहेत. पाणी जलद गतीने मिळावं अशी माझी मागणी आहे.10 टक्के लोकवर्गणीचा विषय अद्याप कोणाकडे घेतला देखील नाही, या योजनेमुळे हजारो नागरीकाना पाणी मिळणार आहे. या मधे कोप्रोलीत सर्वात पाण्याची टंचाई आहे,त्यामुळे टँकर मागवून तेथील सोसायट्यांना पाण्याच्या बीलाचे पैसे द्यावे लागतात- विलास फडके, माजी जिप सदस्य