प्रेस मीडिया लाईव्ह :
काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते.
मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रायगड जिल्ह्यातील नांदवी या छोट्याशा गावात झाला. त्याचं शिक्षण चौथीपर्यंत नांदवीला झाले. त्यानंतर पनवेलला मामांकडे राहिले. मामांची बदली झाल्यामुळे गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करून मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे मनोहर जोशी यांनी 1967 साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रीय सहभागी झाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणेच शिवसेना वाढवण्यात मनोहर जोशी यांचा देखील मोठा वाटा आहे. आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य त्यांनी एकाच शिवसेना पक्षासाठी वाहून दिले होते. विशेष म्हणजे ठाकरे कुटुंबाच्या चार पिढ्यांसोबत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत मनोहर जोशी यांनी काम केले आहे.