प्रेस मीडिया लाईव्ह :
विद्या विकास एज्युकेश सोसायटी संचालित, विकास कॉलेज ऑफ आर्टस् सायन्स अँड कॉमर्स च्या यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ २०२४, कार्यक्रम रविवार दिनांक ०४, फेब्रुवारी २०२४ रोजी कॉलेजच्या सभागृहात पार पडला.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून अग्रनामांकीत विपणन विश्लेषक आणि सल्लागार डॉ. अमित राणे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकास विषयक मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत करून गणेश वंदननेने सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली, मान्यवरांची भाषणे, विद्यार्थ्यांच्या विविध गाणी, डान्स, एकांकिका, नाटक, बक्षीस वितरण असे एकूण कार्यक्रमाचे स्वरूप होते. सदर कार्यक्रमास बक्षिसे ही पोलीस सहाय्यक जनहित सेवा समितीच्या वतीने देण्यात आलीत त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष हर्ष जाधव, सेक्रेटरी अनिता धनेश्वर व खजिनदार अनिता धवन यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे संचालक विकास राऊत सर यांनी भूषविले. सूत्रसंचालन सुप्रिया परब शाह व राजेंद्र जाधव यांनी केले. सदर कार्यक्रम प्रा. विनायक मुळे व इतर प्राध्यापक वर्गाच्या देखरेखीखाली पार पडला. सदर कार्यक्रमात आस्वाद मयेकर, निखिल कुलकर्णी, शारदा सोनावणे, राजेंद्र वाहुलकर, सागर भेंडे यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उत्तमरीत्या आपले कार्य बजावले यावेळी आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.