भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून कात्यायनी ज्वेलर्सवर दरोडा टाकून फरार असलेलया मुख्य आरोपीस अटक .


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- करवीर तालुक्यातील बालिंगा येथे असलेल्या कात्यायनी ज्वेलर्सवर पिस्तुलाचा धाक दाखवून भर दिवसा दरोडा टाकून फरार असलेला मुख्य आरोपी भुपेंद्र गजराजसिंग यादव उर्फ पवन शर्मा (वय 45.मध्यप्रदेश) याला गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून 10 तोळे सोन्यासह पिस्तुल आणि चार काडतुसे असा एकूण 6 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही घटना 8 जून 23 रोजी घडली होती.या आरोपीने हवेत गोळीबार करत सराफ व्यावसायिक रमेश माळी आणि त्यांचा मेव्हणा जितेंद्र माळी या दोघांना बेसमॉल स्टिकचा वापर करत बेदम मारहाण करून दिड लाख रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण दोन कोटीचा ऐवज लंपास केला होता.याबाबतचा गुन्हा करवीर पोलिस ठाण्यात दाखल झाला होता.

पोलिस अधीक्षक मा.महेद्र पंडीत यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर आणि त्यांचे सहकारी या गुन्हयांचा समांतर तपास करीत असताना यातील मुख्य आरोपी पवन शर्मा हा मध्यप्रदेशात असल्याची माहिती मिळाली असता गुन्हा अन्वेषणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर वाघ ,अंमलदार रामचंद्र कोळी,विनोद कांबळे,विलास किरोळकर ,सागर चौगुले ,संजय कुंभार आणि अमित मर्दाने हे पथक मध्यप्रदेशात जाऊन या आरोपीचा शोध घेत बेड्या घालून त्याची झडती घेऊन 10 तोळे सोन्यासह एक पिस्तुल आणि चार काडतुसे जप्त केली असून आतापर्यंत यातील चौघांना अटक करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post