अंबप फाट्या जवळ ट्रकची धडक बसून महिला ठार .



प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- अंबप येथील ट्रकने धडक दिल्याने उमा विश्वजीत तेली (वय 46.रा.सोमेश्वर गल्ली ,शुक्रवार पेठ) या महिलेचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.हा अपघात रविवारी सकाळी झाला असून सदर महिला शेताची कामे आटोपून घरी जात असताना अंबप फाट्या जवळ ट्रकची धडक बसली असता त्या रस्त्यातच खाली कोसळल्या नातेवाईकांनी त्याना बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .या घटनेची नोंद  सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

कागल येथील पोहण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यु.

कोल्हापुर- कोल्हापुरातील रावणेश्वर मंदीराजवळील असलेल्या स्विंमीग ट्य्ंक येथे पोहण्यास गेलेला अक्षय आप्पासाहेब हुच्चे (वय 33.रा.हणबरगल्ली ,गांधी चौक ,कागल) या तरुणाचा मृत्यु झाला.हा प्रकार 24 फ़ेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.त्याला बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली आहे.अक्षय हा पोहत असताना बेशुध्द झाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली.

Post a Comment

Previous Post Next Post