प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले
कोल्हापूर : भारतीय संविधान स्वीकृत दिन भारतीय दलित महासंघातर्फे साजरा करण्यात आला बिंदू चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांतआप्पा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महासंघाचे प्रवक्ते अमोल कुरणे यांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत काळे, जिल्हा संपर्कप्रमुख दयानंद कांबळे, शाहूवाडी अध्यक्ष आकाश कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष सागर घोलप, आकाश गायकवाड, दत्तात्रय ठाणेकर, दाजी कांबळे आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
कोल्हापूर