अरे बापरे ! मोबाईल टॉवरच चोरट्यांनी नेले



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- शहरात आणि शहरा बाहेर काही कंपन्याचे मोबाईल टॉवर बंद अवस्थेत असल्याचा फायदा चोरट्यांनी घेऊन पाचगाव   आणि उचत येथील टॉवर चोरीस गेल्याची तक्रार जीटीएल कंपनीच्या अधि कारयांनी करवीर आणि शाहुवाडी पोलिस ठाण्यात केली आहे.या अगोदर जिल्हयातील 12टॉवरची चोरीची तक्रार एका कंपनीच्या सं बंधित अधिकाऱ्यांनी केली होती.

आता या दोन टॉवच्या चोरीने खळबळ उडाली आहे.या कंपनीचे प्रविण टिकारे(41.कंळबा)यांनी आर.के.नगर परिसरातील टॉवरचे दिड लाखांचे साहित्य चोरीस तक्रार दाखल केली.हा प्रकार जुलै ते ऑगस्ट या काळात घडला असल्याचे .तसेच उचत येथे ही 33 लख 50 हजाराचे टॉवरचे साहित्य चोरीस गेल्याची तक्रार प्रकाश खामकर (49.रा.सातवे) यांनी शाहुवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.या घटनेने टॉवरच्या कंपन्यानी धसका घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post