लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने पोलिस अधीक्षक यांनी आढ़ावा बैठक घेऊन अवैद्य व्यवसायावर कारवाई करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- येणारी आगामी लोकसभा निवडणुकाच्या निमीत्ताने पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी पोलिस अधिकारी यांच्या समवेत आढ़ावा बैठक घेऊन उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचे कौतुक करून जिल्हयात नाकाबंदी करून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना देऊन शहरात वाम मार्गाने होत असलेली अवैद्य मद्याची तस्करी ,शस्त्रे आणि अंमली पदार्थांची होणारी वाहतक  अशा व्यवसायांण वेळीच आळा घालण्याच्या सूचना दिल्या.

बैठक पोलिस अधीक्षक कार्यालयात पार पडली असून बैठकीच्या सुरुवातीस महिन्याभरात कोल्हापुर जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येऊन महिन्याभरातील केलेल्या कामाचा आढावा घेतला .यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई ,उपअधीक्षक अजित टिके ,एलसीबीचे रविंद्र कळमळकर ,जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.यावेळी पोलिस अधीक्षक मा .महेंद्र पंडीत यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने बैठका घेऊन बुथ भेटी  बरोबर रुट मार्चला प्राधान्य देऊन  नाकाबंदीचे पॉइंटही ठरवावेत.दररोज एक अधिकारी आणि कर्मचारी पॉइंटवर नेमून वाहनांची तपासणी करावी.

या काळात गोवा बनावटीची मद्याची तस्करी रोखण्यासाठी तपासणी नाक्यावर दिवसा आणि रात्रीच्या गस्तीत वाढ़ करण्याच्या सूचना दिल्या.तसेच रेकॉर्डवरील सराईताना तडीपार ,प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रस्ताव तयार करावेत.फाळकूटांचा वेळीच बंदोबस्त करावा आणि फ़ेरीवाल्यांना व नागरिकांना कोणी त्रास देत असेल तर त्यांच्या  वर वेळीच कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.त्याच प्रमाणे महिलांच्याही सुरक्षेला प्राधान्य द्यावे.अशा सूचना आढ़ावा बैठकीत देण्यात आल्या .

Post a Comment

Previous Post Next Post