पुईखडी येथील 110 केव्ही सबस्टेशन दुरुस्ती कामासाठी महावितरण कडून सोमवारी विद्युत पुरवठा खंडीत

 सोमवारी पुईखडी वरून पाणी पुरवठा बंद




प्रेस मीडिया लाईव्ह :


मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर ता.23 : पुईखडी येथील 110 केव्ही सबस्टेशन दुरुस्ती कामाकरीता महावितरण कडून विद्यूत पुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरीकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा सोमवार दि.26 फेब्रुवारी 2024 रोजी होऊ शकणार नाही. तसेच मंगळवार दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी होणारा पाणी पुरवठा अपूरा व कमी दाबाने होणार आहे.

            

यामध्ये  ए व बी वॉर्ड  अंतर्गत पाण्याचा खजिना, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, मंगेशकर नगर, मिरजकर तिकटी, भारत डेअरी परिसर, संभाजीनगर, मंडलिक वसाहत, तिकोणे गॅरेज, किर्ती हौसिंग सोसा परिसर, कोळेकर तिकटी, पोतणीस बोळ, शाहू बँक परिसर, कोष्टी गल्ली, प्रॅक्टीस क्लब, वारे वसाहत, साळोखेनगर, बापुराम नगर, महाराष्ट्र नगर, सुर्वेनगर, प्रथमेश नगर, शिवगंगा कॉलनी, प्राध्यापक कॉलनी, वाल्मिकी आंबेडकरनगर, राधे कॉलनी, शांती उद्यान, इंगळे मळा, आई कॉलनी, कात्यायणी कॉम्प्लेक्स परिसर, राजीव गांधी परिसर, जरगनगर, गंजीमाळ, रामानंदनगर, नाळे कॉलनी, विजयनगर, जुनी मोरे कॉलनी, नवी मोरे कॉलनी, वर्षानगर, भारतनगर, सुभाषनगर पंपींग वरील ग्रामीण भाग, पाचगाव, आर.के.नगर, पुईखडी, जिवबा नाना, विशालनगर, आयसोलेशन, वाय.पी.पोवार नगर, वर्षा विश्वास परिसर, शिवस्वरूप कॉलनी, पोस्टल कॉलनी, आर.के.नगर, जरगनगर ले आऊट इत्यादी भागातील नागीकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तरी संबंधीत भागातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post