पिसाळलेल्या कुत्र्याची भाऊसिंगरोडसह दसरा चौकात दहशत.

   अर्ध्या तासात 10 जणांचा चावा घेतला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर - एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने टाकाळा परिसरात मोबाईलवर बोलत थांबलेल्या प्रीतम कृष्णात पाटील (35.रा .करजफ़ेण) याच्या पायाचा चावा घेतल्याची घटना घडली.त्याच कुत्र्याने महानगरपालिका परिसरात आले असता तेथे सेंट्रिंग कामगार भैरवनाथ आनंदा व्हराबंळे (56.रा.वरणगे पाडळी) याचा चावा घेऊन त्याच परिसरातील 10 जणांना चावून जखमी केल्याची घटना घडली असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू आहेत.या मुळे या परिसरातील नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

शहरात असलेल्या अशा भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.पण या कडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते.महापालिकेच्या आसपास भटक्या कुत्र्याचा कळपचा कळप फिरत येणा जाणारयांच्या पाठलाग करत भुंकत दुचाकी ,चारचाकीचासह नागरिकांचा याचा त्रास होत असतो.त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच कारवाई करणे गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post