प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- उजळाईवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर एका कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत सर्जेराव श्रीपती पाटील (65 रा.भादोले) हे जागीच ठार झाले तर दुचाकीस्वार किरण रघुनाथ पाटील (45.रा.भादोले) हे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची नोंद गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात झाली आहे.यातील मयत झालेले सर्जेराव पाटील हे त्यांच्या भावा आणि पुतण्या किरण यांच्या समवेत क.सांगाव येथे नातेवाईकाच्या रक्षा विसर्जना साठी गेले होते.ते आटोपून परत येताना उजळाईवाडी येथे आल्यावर पाठि मागून येणारयां कारने त्यांच्या दुचाकीस धडक दिली असता दुचाकीवर मागे बसलेल्या श्रीपती पाटील यांच्या डोक्याला आणि छातीवर गंभीर जखमी झाले तर किरण याच्या डोक्याला मार लागला.जखमीना 108 या रूग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यात सर्जेराव पाटील यांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. किरण पाटील याची प्रकृती गंभीर असल्याने यांच्यावर प्रथमोपचार करून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .मयत सर्जेराव पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला .