प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर - बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी जनावरांना टेम्पोतुन वहातुक होत असल्याच्या संशय आल्याने त्यानी शाहुपुरी पोलिसांना माहिती दिली अ सता पोलिसांनी आणि बंजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी टाऊन हॉल परिसरात टेम्पो अडवून त्यातील दोन तरुणांनाच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आणि टेम्पो जप्त केला.
शहरात आणि शहरा बाहेर अन्य कारणासाठी मोठ्या प्रमाणात वहातुक होत असून या जनावरांना जास्त किमंत असल्याने चोरट्या वहातुकीत वाढ़ होत आहे.त्या साठी एक यंत्रणा कार्यरत असल्या शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या काही दिवसांत या संघटनेने तीन ठिकाणी पाठलाग करून कत्तलीसाठी नेणारी जनावरांना जीवदान दिले.आज वडणगे परिसरातुन जनावरांची वहातुक होत असल्याच्या संशय आल्याने क.बावड येथील निखील उलपे राजाराम बंधारा येथे जाऊन खड्यात टेम्पो आदळल्याने गायीचा हंबरल्याचा आवाज आल्याने त्यानी पोलिसांना माहिती दिली.सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल मोरे हे आपल्या कर्मचारीसह येऊन बजरंग दलाच्या मदतीने सदरचा टेम्पो अडवून गायीची वहातुक केल्या प्रकरणी शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी जनावरांची टेम्पोतुन वहातुक होत असल्याचा संशय आल्याने त्यानी शाहुपुरी पोलिसांना माहिती दिली.पोलिसांनी बजरंग दलाच्या मदतीने पाठलाग करून टाऊन हॉल परिसरात टेम्पो अडवून टेम्पो चालक राहुल रंगराव पवार (वय.40.शुक्रवार पेठ ,पंचगंगा तालीम .कोल्हापुर)आणि गायीचा मालक कृष्णात भोलाजी एकशिंगे (रा.निगवे दु.)या दोघांना ताब्यात घेऊन शाहुपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करून अटक केली.