प्रेस मीडिया लाईव्ह :
संभाजी चौगुले :
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेत बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन पतसंस्था गटनेते आयु. रघुनाथ मांडरे सर यांच्या हस्ते करणेत आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार लोक कल्याणकारी व प्रगल्भ होते. ते राष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करण्यात इतके लहान नव्हते. त्यांच्या कार्यावर व जीवनावर संस्था संचालकांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांचे विचार मनात घेवून आपले कार्य चालू ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमास संस्था अध्यक्ष आयु. रविंद्र मोरे, उपाध्यक्ष आयु. रघुनाथ कांबळे, समिती सदस्य आयु. राहुल माणगांवकर, ज्येष्ठ संचालक आयु. प्रकाश पोवार, संस्था संचालक आयु. नंदकुमार कांबळे, विकास कांबळे, दिलीप वायदंडे, संजय कांबळे, योगेश वराळे, बापू कांबळे, दत्तात्रय टिपुगडे, विलास दुर्गाड, सुजाता भास्कर, सुजाता देसाई, आण्णा पाटील, व्यवस्थापक बाबुराव साळोखे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.